आज महाराष्ट्र राज्य शासनाकडून 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प अनेक घोषणांनी भरलेला होता. यावरच टीका करताना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा तर निवडणूक अर्थसंकल्प असल्याचे वक्तव्य केले आहे. “देवदर्शन बजेट वगैरे म्हणजे करून करून भागले आणि देवदर्शनाला लागले”, असा चिमटा , देखील त्यांनी फडणवीसांना काढला आहे. “जेवढं काही आहे तेवढं सगळं जाहीर करा, पुढचं पुढं बघू असा हा अर्थसंकल्प आहे. लोकसभे सोबत त्यांना विधानसभेच्या देखील निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्ही तयारीला लागलो आहोत. ” आता नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंसोबत बैठक असल्याचे देखील त्यांनी सांगितले