अंश इंजिनिअरिंग येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सत्यविचार न्युज :
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव त्यानिमित्त अंश इंजिनिअरिंग येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांच्या हस्ते पुजन करून आरती करण्यात आली.
यावेळी वरखडे म्हणाले समाजात वावरत असताना महाराजांचे विचार आत्मसात करून त्या पद्धतीने आपण चारित्र्य जपले पाहिजे व सामाजिक कार्य करताना कोणताही हेतू न ठेवता केले पाहिजे तेव्हाच खरे महाराजांच्या आपण पाईक आहोत.
या वेळी कंपनीचे मालक भरत मोहोड, सामाजिक कार्यकते सत्यब्रत त्रिपाठी , सुपरवायझर मंगेश उघडे, धिरज मालधुरे, अंशुमन मोहोड, वंश मोहोड आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.