श्री क्षेत्र महाळुंगे येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी
सत्यविचार न्युज :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज श्री क्षेत्र महाळुंगे येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव समितीने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात पोलीस पाटील सचिन भोपे, माजी उपसरपंच विशाल भोसले, ग्रामपंचायत सदस्य मनोज इंगवले सहभागी झाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याचे पूजन सचिन भोपे पाटील, विशाल भोसले, मनोज इंगवले यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली व महाराजांना विनम्र अभिवादन केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराजांना सलामी देत महाराजांबद्दल असलेल्या निष्ठेचे दर्शन घडविले.
याप्रसंगी प्रकाशभाऊ भांगरे, शंकर महाळुंगकर, सुनील गायकवाड, अक्षय शिवळे, विशाल नाना मेमाने, शैलेश गायकवाड, सुरज वाळके, संदेश महाळुंगकर, अनिकेत गायकवाड, रोहित मेमाणे, प्रथमेश जाधव, अतुल जावळे, रमेश भोसले, अमन मिंडे, सम्राट तुपे, प्रतीक तुपे, श्रीकांत पाडेकर, वामन तुपे, पुनीत पवार, साहिल भोईर, कालिदास जाधव, कैवल्य जाधव व ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.