थोरल्या पादुका मंदिर तर्फे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांचा सत्कार
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240123-WA0049-1-1024x683.jpg)
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल ॲड .राजेंद्र उमाप यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्ट चे वतीने संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल रुख्मिणी यांची मूर्ती देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर, ह. भ. प. महारुद्र रेडडे महाराज, मनोहर भोसले, गणेश महाराज तापकीर, ह .भ. प. सचिन महाराज गिलबिले, ह .भ. प. रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, शिवाजी तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अयोध्येतील श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात सलग पाच दिवस रामनामाचा जप, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री माऊलींचे मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन सेवा झाली. या निमित्त मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी काढण्यात आली. महिला भजनी मंडळाची भजन सेवा रुजू झाली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाप्रसाद वाटप भाविकांना उत्साहात करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी दिली.