मुख्यमंत्री शिंदेंचे बाजूने निकालाचे आळंदीत स्वागत ; फटाक्यांची आतिषबाजी
आळंदी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखल डाव्यांचे निकालाचे वाचन करीत निकाल जाहीर केला. यात शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंचे बाजूने शिवसेनेची मान्यता देत निकाल देण्यात आला. या निकालाचे खेड तालुका शिवसेना, आळंदी शहर शिवसेना तसेच शिवसेना सहकार सेना या पक्ष संघटनेतील विविध विंग च्या वतीने जाहीर झालेल्या निकालाचे स्वागत करीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आळंदीत विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, युवासेना उप तालुका प्रमुख खेड पै. योगेश पगडे, सहकार सेना उप तालुका प्रमुख खेड शंकर (आण्णा) घेणंद, शिवसेना शाखा प्रमुख चऱ्होली खुर्द संदीपभाऊ पगडे, ह भ प तुकाराम महाराज ताजणे, दिनकर तांबे, रोहिदास कदम, दिनकर तांबे, ज्ञानेश्वर घुंडरे पा., गोविंद ठाकूर यांचेसह आळंदी शहर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, वारकरी उपस्थित होते. यावेळी परिसरात जोरदार घोषणा बाजी देत निकालाचे स्वागत उत्साहात करण्यात आले.