आळंदीत माऊलींचे संजीवन समाधीवर जलाभिषेक
प्रक्षाळ पूजेस भाविकांची गर्दी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रींचे ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानंतर प्रथापरंपरांचे पालन करीत श्रींचे संजीवन समाधीवर प्रक्षाळ पुजेत समाधीला भाविका कडून जलाभिषेक करण्यात आला. प्रक्षाळ पूजेस भाविकांनी श्रीचे दर्शनास गरम पाण्याने जलाभिषेक करीत लिंबू, साखर, मध लावून प्रक्षाळ पूजेत श्रीचे दर्शन घेतले. आळंदी परिसरातून भाविकांनी श्रीचे दर्शनास मंदिरात गर्दी केली.
प्रक्षाळ पुजेस भाविकांची दर्शन व्यवस्था, भाविकांना जलाभिषेकास मंदिरात गरम पाणी उपलब्ध करून वाटपास देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे चोपदार, श्रीचे पुजारी राजाभाऊ चौधरी, देवस्थानचे सेवक, मानकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.
कार्तिकी यात्रा झाल्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर लिंबू, गरम पाणी, साखर, मध अत्तर लावून भाविक, नागरिकांनी संजीवन समाधीवर प्रक्षाळ पूजेत जलाभिषेक करून श्रीचे दर्शन घेतात. कार्तिकी सोहळ्यानंतर मंदिरातील प्रथा, परंपरेने होणा-या कार्यक्रमात प्रक्षाळ पूजेचे विशेष महत्त्व आहे. मंगळवारी ( दि. १९ ) भाविकांनी श्रीचे संजीवन समाधीवर जलाभिषेकास गर्दी केली होती.
मंदिरात धार्मिक कार्यक्रमात श्रीचा पवमान अभिषेक पूजा विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे हस्ते झाली. यावेळी श्रींचे क्षेत्रोपाद्ये यांनी पौरोहित्य केले. परंपरेने श्रीना महानैवेध्य, विना मंडपात नित्य नैमित्तिक प्रवचन सेवेस सुरुवात, कारंजा मंडपात भजन सेवा, धुपारती, गावकरी भजन झाल्यानंतर परंपरेने काठयाचा महाप्रसाद वाटपाने प्रक्षाळ पूजेची सांगता झाल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. सर्व भाविकांना रांगेत कमी वेळेत दर्शन देण्यासाठी सेवक कर्मचारी यांनी यशस्वी नियोजन केल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. यासाठी संस्थानचे सेवक,सुरक्षारक्षक,मानकरी यांनी काम पाहिले.
: माऊलींचे संजीवन समाधीवर प्रक्षाळ पुजेत भाविकांनी जलाभिषेक केला. देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ श्रींची पूजा करताना. श्रींचे प्रक्षाळ पूजेतील वैभवी रूप.