फुलगाव शनी मंदिरात भाऊबीज दिनी दीपोत्सव
आळंदी : येथून जवळ असलेल्या पेशवे कालीन फुलगाव येथील श्री शनेश्वर शनी मंदिरात दीपावली निमित्त भाऊबीज दिनी आळंदी धाम सेवा समिती च्या वतीने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांचे प्रकाशने मंदिराला सोनेरी झळाळी आल्याने मंदिर लक्षवेधी प्रकाशमान दिसत होते भाविकांनी दर्शनास दिवसभर गर्दी केली होती यावेळी मुख्य संयोजक आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष तसेच आळंदी शहर शिवसेनेचे प्रमुख राहुल शेठ चव्हाण, भोलापुरीजी महाराज, अर्जुन मेदनकर, दिलीप महाराज ठाकरे, सचिन महाराज शिंदे दिनकर तांबे ज्ञानेश्वर धुंडरे पाटील नितीन ननवरे अविनाश राळे, अनिल जोगदंड, मंदिर व्यवस्थपन ट्रस्ट चे अध्यक्ष शामाकांत कोलापकर, विश्वस्त गौतम पाटोळे , रोहिदास कदम आदी उपस्थित होते.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231116-WA0005-1-466x1024.jpg)