परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला फासावर लटकवा,.
विशाल तुळवे यांची मागणी,.
चाकण : प्रतिनिधी
परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला तातडीने फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस विशाल तुळवे यांनी केली आहेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याने संपूर्ण खेड तालुक्यात संतापाचा भडका उडाला आहे. संबंधित आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी करत विशाल तुळवे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावणाऱ्या समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी विशाल तुळवे यांनी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. संविधानाला श्रेष्ठ मानने अपेक्षित असून, या घटना माणुसकीला काळीमा फासणा-या आहेत. जातीयवादी समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्यघटनेची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद घटना आहे. परभणीतील या घटनेने खेड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. संविधानाला धोका निर्माण करणारी राजकीय व्यवस्था सध्या केंद्र आणि राज्यात कार्यरत आहे. घटनात्मक मूल्य पायदळी तुडवून राज्याचा कारभार चालवला जात आहे. परभणीतील या प्रकरणाची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी. या प्रकरणाचा सूत्रधार कोण, त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास करून संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने संबंधित व्यक्तीचा छडा लावून त्याच्यासह त्याच्या पाठीराख्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून हे सरकार भारतीय संविधान व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सरकार आहे का, हे शासनाने आपल्या कृतीतून सिद्ध करावे अन्यथा आगामी काळात महाराष्ट्रभर आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विशाल तुळवे यांनी दिला आहे.