खरपुडी बुद्रूक येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कोमल काळुराम चौधरी हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तिच्या यशामुळे खरपुडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खरपुडी येथील वडिलोपार्जित शेती व्यवसाय करणारे काळुराम चौधरी यांची कन्या कोमल चौधरी हिने साने गुरुजी विद्यालयात शिक्षण घेतले. तसेच पदवीचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी येथून पूर्ण झाले.
लहानपणापासूनच कोमलला स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राबद्दल आकर्षण होते. त्यामुळे पदवीच्या शिक्षणानंतर नोकरीची मिळालेली संधी डावलून २०२२ पासून स्पर्धा
परीक्षांची तयारी सुरू केली. व दुसऱ्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड होऊन यश संपादन केले.
कोमलला अभ्यासाच्या प्रवासात आई-वडील, नातेवाईक, मित्र- मैत्रिणी याचे सहकार्य मिळाले. प्रामाणिक प्रयत्न व स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून जिद्दीने तयारी केल्यास या क्षेत्रात नक्कीच यश मिळते, असे कोमलने तिच्या या यशानंतर सांगितले.
साने गुरुजी विद्यालय खरपुडी तालुका खेड येथील माजी विद्यार्थिनी कोमल काळूराम चौधरी पाटील हिची पी.एस.आय. पदी निवड झाली. त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कोमलने खरोखरच अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन तिने यश संपादन केले. लहानपणापासूनच तिच्यामध्ये एक प्रकारची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वास दिसून येत होता. परंतु खरपुडी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुका व जिल्ह्यामधून तिचे अभिनंदन होत आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बापूसाहेब चौधरी पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र चौधरी पाटील व त्यांचा सर्वच स्टाफ यांनी कोमलचे यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले खरपुडीचे नाव उज्वल करण्यामध्ये तिने एक मानाचा तुरा रोवला आहे .