माऊलींच्या पालखीचा परतीच्या प्रवासातील मुक्काम हडपसर मध्ये.
आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी माऊलींची पालखी हडपसर मध्ये पोचली. या ठिकाणी आजचा मुक्काम असून उद्या दिनांक 29 जुलै रोजी माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे.
अखंड महाराष्ट्राचं दैवत श्री पांडुरंगाचे दर्शन करून परतीचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी हडपसर येथे मुक्काम केला. विठ्ठल नामात दंग होऊन वारकऱ्यांचा असणारा उत्साह
हा दर्शनीय होता. पालखी चा प्रवास हा अखंड चालू रहावा असे मत विठ्ठल भक्तांनी व्यक्त केले. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हिंदू धर्माला जिवंत ठेवणारा वारकरी संप्रदाय, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय, शिस्तप्रिय आणि शांतता प्रिय असणारा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायातील पांडुरंगाच्या भक्तीत अखंड स्नान करणारे विठ्ठल भक्त असे अतिशय विलोभनीय दृश्य यावेळी पाहण्यास मिळाले.