डेहणे महाविद्यालयात माजी विध्यार्थी मेळावा संपन्न
सत्यविचार न्यूज :
हु.रा.शि.प्र.मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विध्यार्थी मेळावा संपन्न झाला
या प्रसंगी संस्थेचे संचालक अरुणशेठ चांभारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी विध्यार्थांची महाविद्यालयाच्या विकासात महत्वाची भूमिका असण्याचे प्रतिपादन केले.
कृषी उत्पन बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी उच्च शिक्षणापासून वंचित असलेले खेड तालुक्यातील पश्चिम पट्यातील विध्यार्थांसाठी महाविद्यालय सुरु करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर भागवत यांनी या महाविद्यालयात शहरी महाविद्यालायाप्रमाणे सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून विध्यार्थानी त्याचा लाभ घ्यावा असे म्हटले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. मोहनबाबू देवगडे तर प्राध्यापक मनोगत उपप्राचार्य प्रा. सिलदार पावरा यांनी केले सूत्रसंचालन प्रा. भास्कर जगदाळे तर आभार प्रा.राहुल गायकवाड यांनी मांडले.
या याप्रसंगी माजी विध्यार्थी संघाचे अध्यक्ष पवन थोरात व विध्यार्थी अध्यक्ष राहुल जठार व माजी विद्यार्थी उपाध्यक्ष अनिल सावंत व माजी आजी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.