चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत जनआंदोलन उभारण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन
चाकण : जगातील दुसऱ्या क्रमांकाची व आशिया खंडातील
सत्यविचार न्यूज :
सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण एमआयडीसी व तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-नासिक महामार्गावर होणाऱ्या चाकणच्या वाहतूक कोंडीला त्रस्त झालेल्या चाकण पंचक्रोशीतील नागरिकांनी यावर उपाय योजना व व्यापक जन आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राजकीय पुढारी विरहित बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक रविवार २८/७/२०२४ सायकाळी ४.०० वाजता श्रेया लॉन्स, चाकण-तळेगाव रोड, नाणेकरवाडी येथे होणार आहे. तरी सर्व सजग नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता सुधारणा चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.