अभिनव बिंद्रा यांना Paris Olympics मध्ये मिळणार मोठा सम्मान; भारताच्या सुवर्णपदक विजेत्याला मिळणारा या ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कारची खासियत काय ?
Abhinav Bindra Olympic Order Award: भारताकडून नेमबाजीत अभिनव बिंद्रा यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. भारताचा नेमबाजी दिग्गज अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले.
भारताकडून नेमबाजीत अभिनव बिंद्रा यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. भारताचा नेमबाजी दिग्गज अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनव बिंद्राचे अभिनंदन केले. बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हणजे २४ जुलै २०२४ रोजी ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने मिळाल्याबद्दल भारतीय नेमबाजीचा दिग्गज अभिनव बिंद्रा यांचे अभिनंदन केले. 2008 बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले
मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, “अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित केल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अभिनवचे अभिनंदन, खेळाडू म्हणून असो किंवा नवोदित खेळाडूंचे मार्गदर्शक म्हणून, त्यांनी क्रीडा आणि ऑलिम्पिक चळवळीत उल्लेखनीय योगदान दिले आहे.”
घोषणा करताना,आयओसी अध्यक्ष म्हणाले,” मला तुम्हाला हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आयओसी कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिक चळवळीतील तुमच्या उत्कृष्ट सेवांसाठी ऑलिम्पिक ऑर्डर देऊन तुमचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.”
10 ऑगस्ट रोजी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार हा आयओसीद्वारे एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमधील 142 व्या आयओसी सत्रात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार काय आहे?
ऑलिम्पिक ऑर्डरची स्थापना 1975 मध्ये झाली. हा ऑलिम्पिक चळवळीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. हे विशेषत: ऑलिम्पिक चळवळीतील विशिष्ट योगदानासाठी दिले जाते. पारंपारिकपणे, आयओसी प्रत्येक संबंधित ऑलिम्पिक खेळांच्या समारोप समारंभात मुख्य राष्ट्रीय आयोजकांना ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करते.
41 वर्षांच्या बिंद्रा यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा ते भारताचा पहिला खेळाडू आहे. अभिनव हे 2010 ते 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) च्या ऍथलीट समितीचे सदस्य होते, ज्यापैकी ते 2014 पासून अध्यक्ष आहेत. 2018 पासून ते IOC ऍथलीट्स कमिशनचे सदस्य आहेत.