चाकणला लाडकी बहिण
योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी
चाकण : प्रतिनिधी
श्रीरामनगर फेडरेशन व उद्योजक साहेबराव कड आणि माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे यांच्या पुढाकाराने चाकण येथे प्रभाग क्रमांक बावीस मधील श्रीरामनगर गृहप्रकल्पात लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी तरुणी, महिला व पुरुष यांची प्रचंड गर्दी होवू लागली आहे. या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
चाकण येथे लाभार्थींचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने नव्याने लाडकी बहीण ही अभिनव योजना सुरु केली आहे. दर महिना पंधराशे रुपये मिळणार असल्याने या योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी महिलांची एकच गर्दी होत आहे. दरम्यान, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. बऱ्याचदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑफलाइन फॉर्म भरून घेतले जातात. सामाजिक बांधिलकीतून महिलांना मोफत अर्ज भरून देण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांना अर्ज भरून देताना काही किरकोळ अडचणी निर्माण होतात. मात्र या अडचणी देखील अर्ज भरतेवेळी सोडविल्या जात आहेत. या कामी शहरात मोक्याच्या पाच ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. स्वतंत्र संगणक, मोबाईल व्यवस्थेसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण या योजनेचे मोफत अर्ज भरून घेण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या कर्मचारी शैला शरमाळे व प्रियांशी पाटील, चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे, उद्योजक साहेबराव कड व अजय मनसुख आदींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी कल्पना रोकडे, नम्रता कोटलवार, वैशाली कासार व सरोजा कुलकर्णी आदि शेकडो महिलांनी या योजेनेचे अर्ज दाखल केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000578924-1024x624.jpg)
Show quoted text