Mahalunge : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे येथे करण्यात आली.
कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय 34, रा. महाळुंगे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे(Mahalunge) नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद खैरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश भोसले हा गांजा विक्री करत असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 73 हजार 200 रुपये किमतीचा एक किलो 464 ग्रॅम गांजा (Mahalunge) जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.