Rain : यंदा 1 जूनला मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर अवकाळी पावसाचा जोर ओसणाऱ्याची शक्यता
सत्यविचार न्यूज –
गेल्या दोन ते 3 दिवसापासून राज्यभरात ( Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.याच पार्श्वभूमीवर आता मोसमी वारे हे 19 मे रोजी अंदमान व निकोबार बेटांवर तर 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अवकाळी पावसाचा जोर हा 17 मे नंतर विदर्भ वगळता ओसरणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे शनिवारी ( 11 मे) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात, दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटावर धडक देण्याचा अंदाज ( Rain) आहे.
सर्वसाधारणपणे मोसमी वारे सरासरी 22 मे रोजी अंदामानात दाखल होतात. त्यानंतर आठवड्याभरात, 1 जूनच्या सुमारास देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळमध्ये दाखल होतात. मात्र बंगालच्या उपसागरातील वाटचालीवर मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये दाखल होणे अवलंबून असते. त्यामुळे आता मोसमी वारे अंदमानात दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.