पनालाल गुणवरे यांचा आदर्श
घ्या – जयप्रकाश जगताप
सत्यविचार न्यूज :
शैक्षणिक संकुलामुळे चाकण पंचक्रोशीतील हजारो युवक – युवतींना पदवीपर्यंतचे शिक्षण अविरतपणे मिळत आहे. याचा संस्था चालकांना व ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणारे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पनालाल गुणवरे यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे विचार जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांनी येथे व्यक्त केले.
जनता शिक्षण संस्थेच्या येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व सितामाई भिकोबाशेठ पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पनालाल गुणवरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त चाकण प्रशालेत सन्मान करण्यात आला. त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कारले, सचिव सुभाष जावळे, प्रशालेचे प्राचार्य अनिरुद्ध काळेल, प्रा. राजेंद्र खरमाटे, कविता गोरे, प्रदीपकुमार नागवडे, बाळासाहेब पौळ, हेमंत तांबे, सुभाष गारगोटे, रविंद्रनाथ नवले, अनिल ठुबे, संदीप म्हेत्रे, बाळासाहेब खामकर, तुकाराम थोरात, नितीन गोरे, विशाल नायकवाडी, सुदाम शेवकरी, मीरा गुणवरे आदींसह चाकण प्रशालेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनालाल गुणवरे यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करून जगताप म्हणाले,” गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे काम करत गुणवरे यांनी चाकण प्रशालेच्या सर्वच उपक्रमांना उत्तम सहकार्य केले आहे. चाकण कनिष्ठ महाविद्यालयाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे गुणवरे यांचे विकास कार्यात बहुमोलाचे सहकार्य होते. विद्यार्थ्यांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.” याप्रसंगी वरील मान्यवरांनी गुणवरे यांच्या उत्तुंग कार्याचा यथोचित गौरव केला. प्रा. अनिल ठुबे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. प्रा. राजेंद्र खरमाटे यांनी आभार मानले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000323320.jpg)