उद्योजक लक्ष्मण कोद्रे यांचे निधन
आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वर्षा पंडित कोद्रे यांचे सासरे व कोद्रे मंडप स्पीकर्सचे मालक उद्योजक लक्ष्मण हनुमंत कोद्रे ( वय ८० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने ( बुधवारी ) निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, एक भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. युवा उद्योजक पंडित कोद्रे, गणेश कोद्रे, कमलेश कोद्रे यांचे ते वडील होत. त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.