स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त धार्मिक पर्वणी
सत्यविचार न्यूज :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्राच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप ,यज्ञ व गुरुचरित्र पारायण सप्ताह तसेच भव्यसिद्ध मंगल पादुका पूजन सोहळा (मंगळ), ३० एप्रिल ते (सोम) ६ मे २०२४ या कालावधी पर्यंत विविध अध्यात्मिक ,धार्मिक जसे की होम –हवन,यज्ञ, स्तोत्र –मंत्र पठण ,धार्मिक ग्रंथांचे वाचन अशा विविध सेवा सेवेकरांच्या मार्फत या सात दिनांपर्यंत सात दिवसाच्या सप्ताहात सामुदायिक, एकत्रितपणे पार पाडले जाणार आहेत.
आळंदी वडगाव रोड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम ,जप, यज्ञ व गुरुचरित्र पारायण सप्ताह तसेच भव्य सिद्धमंगल पादुका पूजन सोहळा तसेच विविध आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सात दिवस अखंडपणे चालत असणाऱ्या साप्ताहिक सामुदायिक सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे नियोजित केली आहे.
सामुदायिक गुरुचरित्र वाचन – सकाळी ८.१५ ते १० वाजता.
सकाळी –८ वा. भूपाळी आरती.
सकाळी– ८.३० वा.महा अभिषेक
सकाळी –०९ ते ९.३०वा. विविध स्तोत्र–मंत्रांचे हवन,
सकाळी – १०.३० वा. नैवेद्य आरती (मंत्रपुष्पांजली सह)
सकाळी– १०.३० ते १२.३० वा. विशेष याग (होम –हवन),
सकाळी_ ११ ते सायं ६ सिद्धमंगल पादुका पूजन,
दुपारी_ २ ते ६ वा. स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती व मल्हारी सप्तशती वाचन.
सायंकाळी –५ ते ६ औदुंबर प्रदक्षिणा. सायंकाळी– ६.३० वा. नैवेद्य आरती (मंत्रपुष्पांजली सह) व मार्गदर्शन, गीता, मनाचे श्लोक, पसायदान ,विष्णू सहस्त्रनाम वाचन .
वरील दैनंदिन साप्ताहिक कार्यक्रमा बरोबरच स्वामींची प्रहर सेवा म्हणजेच अखंड वीणा वादन, स्वामी समर्थ अखंड जप स्तवन ,नाम स्मरण, मननं ,चिंतन ही आध्यात्मिक सेवा, उपासना श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भाविक सेवेकर्यांसाठी अविरतपणे चालू राहणार आहे. अखंड वीणा वादन ,स्वामी समर्थ अखंड नामस्मरण जपासाठी स. ८ ते सायं. ८ महिला वर्गासाठी तर सायं ८ ते स. ८ पुरुष वर्गासाठी अशा दोन वेगळ्या वेळा निर्धारित केल्या आहेत. ग्रामदेवता सन्मान ,मंडल मांडणी, स्थापित देवता हवन, नित्य स्वाह:कार ,श्री गणेश याग व श्री मनोबोध याग ,श्री स्वामी याग ,श्री रुद्र याग ,मल्हारी याग व शेवटी बलिपूर्णाहुती, सत्यदत्त पूजन ,अखंड नाम , जप ,यज्ञ सप्ताह सांगता केली जाईल. स्वामी केंद्रात एकाच वेळी सामुदायिकपणे शेकडो / हजारो पारायण करण्याची सुसंधी वर्षातून फक्त दोनदाच मिळते सेवेकरी, भाविकांनी ही संधी साधायची आहे. अखंडितपणे सात दिवस ही सेवा चालू राहणार असून या विविध आध्यात्मिक कार्यक्रम सेवेचा जास्तीत – जास्त लाभ भाविकांना मिळणार आहे. विविध आध्यात्मिक सेवा भाविकांच्या हातून घडून येणार आहेत. “केल्याने होत आहे रे | आधी केलेची पाहिजे”|| तेव्हा चला या सप्ताहात विविध सेवांच्या अमृत वर्षावात चिंब भिजुन अध्यात्माचा निखळ आनंद घ्या. सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ व पाचवा वेद म्हणून मान्यता असणाऱ्या ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाचे पारायण करण्याची सुवर्णसंधी आपणास ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळणार आहे. सोमवार ६ मे ला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांची सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तरी भाविकानी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन गुरुचरित्र ग्रंथांचे पारायण व प्रहर सेवेसाठी नाव नोंदणी हि केंद्र विभाग प्रतिनिधी कडे करावी. स्थानिक व इतर जवळच्या परिसरातील सर्व भाविक , सेवेकर्यांनी या विशेष अध्यात्मिक सेवेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती केंद्र विभाग प्रतिनिधी, केंद्र चालकांच्या वतीने करण्यात आली आहे.