राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी रमेशआप्पा चौधरी यांची निवड
सत्यविचार न्युज :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी रमेशआप्पा विठ्ठल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्तीची घोषणा जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद पवार यांच्या विचारानुसार त्यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे विकासात भरीव काम करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय कार्यरत रहाणार असल्याचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी सांगितले.
चौधरी यांनी यापूर्वी गोलेगाव विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन, खेड तालुका खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारणी वर निवड, खेड तालुका किसान सेल अध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी सक्रिय राहून काम पाहिले आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदी रमेश चौधरी यांची निवड झाल्याबद्दल पक्ष संघटनेत नियुक्तीचे स्वागत करण्यात आले आहे. विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांनी चौधरी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.