विद्यार्थ्यांनी जोपासला सांस्कृतिक स्थळांचा वारसा,.
सत्यविचार न्युज :
एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या येथील विद्याव्हॅली इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘ वर्ल्ड हेरिटेज डे ‘
या दिवसाचे औचित्य साधून सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्याला भेट देवून सांस्कृतिक स्थळांचा वारसा जोपासला आहे. विद्याव्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती रणदिवे यांच्या संकल्पनेतून या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यातुन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मुल्ये जतन व रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किल्लेदार फि
रंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे सल्लागार राजीव दिक्षित यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दामोदर मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व व संग्रामदुर्ग किल्ल्याचा इतिहास समजावून सांगितला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याची सामुहिक शपथ घेतली. चाकण शहराला चाकण हे नाव कसे पडले. चाकणचा ऐतिहासिक इतिहास हा आठव्या शतकापासून आहे. व तो विद्यार्थ्यांनी कसा जोपासावा याबद्दल दीक्षित यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी सांस्कृतिक वारसा भावी पिढीने जोपासण्याचे आवाहन केले. शाळेच्या सांस्कृतिक विभागाने शाळेमध्ये हेरिटेज काॅर्नर व हेरिटेज वॉल साकारले. तसेच हेरिटेज टॉकचे आयोजन केले होते. मोनाली नलावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.