चाकण येथे बुधवारी रामनवमी उत्सव,.
सत्यविचार न्यूज :
चाकण येथे श्रीरामनगर मित्र मंडळाच्या वतीने बुधवारी ( दि. १७ ) रामनवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक साहेबराव कड यांनी दिली. चाकण येथील शिक्रापूर रस्त्यावर अगदी रस्त्यालगतच श्रीरामाचे मंदिर आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या मंदिरात बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यत आले आहे. उत्सवाच्या दिवशी सकाळी देवाचा अभिषेक, हारतुरे, श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दहा वाजता समाजप्रबोधनकार हभप. विलास महाराज वाघ यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. चाकण मधील नागरिक व भाविकांनी श्रवणसुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे, उद्योजक साहेबराव कड, अजय मनसुख, ज्ञानेश्वर मुंगसे, प्रकाश वाडेकर, नितीन देशपांडे आदींनी केले आहे.