नदीत अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपण
पानसरे परिवाराचा निर्णय; परिसरात कौतुक
सत्यविचार न्यूज :
निघोजे महानगाव (ता. खेड) येथील संगीता किरण पानसरे यांचे बुधवारी (दि.३) दुःखद निधन झाले. त्यांचा अस्थी व रक्षा विसर्जनाचा विधी पानसरे कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेनुसार नदीपात्रात न करता आपल्या शेतामध्ये खड्डे खोदून त्यामध्ये अस्थी टाकून त्यावरती दोन आंबे, दोन, चिकू आणि एक नारळाचे असे पाच स्मृतीरुक्ष लावले.
वृक्षाचे महत्व पाहता व जलप्रदूषण वाचावे यासाठी प्रत्येक घटकांनी समाजाने नागरिकांनी आपल्या आवडत्या आईवडील नातेवाईक यांच्या स्मृती च्या निमित्ताने वृक्ष लावले पाहिजे. जे कायम आपला सह येणाऱ्या पिढीला त्यांची स्मृती देत राहतील, असे पानसरे कुंटुबांनी सांगितले.
पर्यावरण जागर प्रतिष्ठान मार्फत राबविला जाणारा हा उपक्रम समाज हिताचा असून या निमित्ताने वृक्ष लावण्यासोबत त्याचे संवर्धन होत आहे. यावेळी निघोजे महानगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.