थोरल्या पादुका ट्रस्ट तर्फे पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचा सत्कार
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी चे विश्वस्त योगी निरंजननाथ यांची श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी निवडी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे वतीने संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, श्री विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर, ह. भ.प. किसनअप्पा लोखंडे, ह.भ. प. अंकुश भाडळे, ह.भ.प. मारुती कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अँड.तापकीर यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचा सत्कार करीत हार्दिक शुभेच्छा दिल्या.