चाकण येथे रंगणार स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा
सत्यविचार न्यूज :
श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त चाकण येथे बुधवारी (दि.10) सोहळा रंगणार आहे. कडाची वाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चाकण, चाकण शिक्रापूर रोड कडाचीवाडी गणपती मंदिर पासून आतमध्ये टॉवर जवळ,
येथे सकाळपासून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा :
दिनांक १० एप्रिल
- परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज मुर्तीवर्ती महाभिषेक 8 – भूपाळी आरती
8:30 ते 10 – श्री स्वामी चरित्र सारामृत सामूहिक पारायण
10:30 – महानैवेद्य महाआरती
रात्री 11 ते 11 वा. दुपारी ४ वा. – श्री सिद्धमंगल पादुका पूजन
दु. २ ते ६ – आपल्या वैयक्तिक अडीअडचणी वरती विनामूल्य प्रश्नोत्तरे
संध्याकाळी: 6 वाजता महानैवद्य आरती व मार्गदर्शन
सायंकाळी ७ वाजता – भव्य महाप्रसाद
श्री स्वामी जयंती निमित्त परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या निर्गुण दिव्य पादुकांचे भव्य दर्शन सोहळा (पादुका दर्शन वेळ – सायं: ४ ते रात्री ८ पर्यंत)
श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त पुजा, आरती, महाप्रसाद अशा कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी भक्त सेवेकऱ्यांनी तथा भक्त् परिवाराने केले आहे.