आळंदीत पिण्याचे पाणी नियमित पुरेशा प्रमाणात देण्याची मागणी
मुख्याधिकारी केंद्रे यांना साकडे
सत्यविचार न्युज : आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मधील तापकीर नगर , इंद्रायणी नगर, देहू फाटा येथील परिसरात रहिवासी नागरिक यांना पिण्याचे पाणी नियमित पुरेशा दाबाने मिळावे अशी मागणी शिवसेना ( उद्धव बा. ठाकरे गट ) आळंदी उपशहर प्रमुख शशिकांतराजे जाधव यांनी केली आहे.
या मागणीसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत साकडे घातले आहे.
आळंदीत नियमित उच्च दाबाने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने महिला, नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे महिला वर्ग हैराण झाला आहे. आळंदीत सद्या दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. मात्र यातून नागरिक समाधानी नाही. होणारा पाणी पुरवठा हा अनियमित, कमी दाबाणे अपुरा होत आहे. तसेच वेगवेगळ्या काम निमित्त अधिकचा पाणी पुरवठा बंद राहत असल्याने अनेकांना कधी कधी तीन ते चार दिवसांनी पाणी मिळत असल्याने आळंदीत पाणी पुरवठ्याचे कामकाजावर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांचे घरी पाणी साठवण यंत्रणा नसल्याने अनेकांना पाणी पुरवठ्याचे नियोजन अभावी गैरसोय होत आहे. यामुळे पाणी पुरवठा विभागावर नागरिकांचा रोष आहे. स्थानिक संस्थेचे प्रमुख या नात्याने पर्यायी जबाबदारी आपणावर येत असून नियमित पुरेशा प्रमाणात उच्चं दाबाने पाणी पुरवठा या भागात मिळावा. यासाठी निवेदन देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. नगरपरिषदेने जाहीर केलेल्या झोन प्रमाणे आणि दिलेल्या वेळेत पाणी पुरवठा व्हावा. रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा बंद व्हावा. शक्यतो रात्री दहा वाजे पर्यंत संपूर्ण आळंदीत पाणी पुरवठा पूर्ण होईल असे तात्काळ नियोजन करण्यात यावे. किमान एक तास पाणी पुरवठा नियमित मिळावे अशी मागणी करीत अपुऱ्या दाबाने होणार पाणी पुरवठा उच्चं दाबाने होण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी
करण्यात आली आहे. आळंदीत या पुढील काळात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा. अन्यथा या मागणीस सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा खणखणीत इशारा शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिजाऊंचे वंशज शशिकांतराजे जाधव यांनी परिषदेस दिला आहे.