Pune : वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट
सत्यविचार न्यूज -मनसे ला सोडचिट्ठी देऊन वसंत मोरे यांनी (Pune) आज शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात हि भेट झाली. यावेळी मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वसंत मोरे म्हणाले ,शरद पवारांची मी भेट घेतली (Pune) आहे. लोकसभेसाठी मी एक वर्षापासून इच्छुक आहे. महाविकास आघाडीने संधी दिली तर कासब्याची पुनरावृत्ती करून दाखवेल हे सांगायला मी शरद पवारांची भेट घेतली आहे.
शरद पवारांना काही गोष्टी मी लिहून दिल्या आहेत.मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आहे.
ते पुढे म्हणाले,मला आजची वेळ सुप्रियाताई यांनी घेऊन दिली होती. माझ्या उमेदवारीचा फायदा शिरूर आणि बारामती मध्ये कसा होऊ शकतो हे 2019 मध्ये ही माहित होतं.
बारामती शिरूर आणि पुणे हा जर त्रिकोण पूर्ण झाला तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रभुत्व येऊ शकतं या गोष्टी मी अमोल कोल्ह्यांना सांगितल्यात आहेत.