पहिले पर्व : स्पर्धेत ५६ संघातील सुमारे ८४० खेळाडूंचा सहभाग
शिरुर प्रिमियर लिग स्पर्धेत शिवशंभो वारीयर्स जातेगाव संघ चॅम्पियन
सत्यविचार न्युज :
पुणे : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अखिल शिरुर तालुका आयोजक कमिटीने आयोजित केलेल्या शिरूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जातेगावचा शिवशंभो वारीयर्स संघ चॅम्पियन ठरला. तर रांजणगाव सांडस संघाचा द्वितीय क्रमांक आला. विजेत्या संघाला रोख ५५ हजार ५५५ रुपये व उपविजेत्या संघाला ४४ हजार ४४४ रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान स्पर्धेत निलेश इंगवले मालिकावीर, शुभम शेळके उत्कृष्ट फलंदाज तर दत्तात्रय चोरे उत्कृष्ट गोलंदाज किताबाचे मानकरी ठरले.
शिरूर प्रीमियर लीग स्पर्धेत तालुक्यातील ५६ संघातील सुमारे ८४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण उद्योजक बाळासाहेब पाचुंदकर, शिरूर – आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य आयोजक यशवंत पांचगे, पै. प्रविण गव्हाणे, माऊली थेऊरकर, भानुदास पऱ्हाड, सागर लांडे, संदीप गिरे, संदीप चौधरी, दत्तामामा थिटे, सकेंत गवारे, विशाल पवार, सरपंच मोहन शेळके, गणेश भाऊ भोंगळे, विशाल नळकांडे, एकनाथ पाचंगे आदींच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गोविंद पाचंगे, सुनील फडके, गणेश पाचंगे, भाऊसाहेब पाचंगे, उमेश भंडारे, मंदार पाचुंदकर, राहुल पवार, अविनाश गावडे, सागर दंडवते, पप्पू तोडकर, अमोल पवार, मयुर बेंद्रे, सचिन सांबारे, सुजित शेलार, हरुनभाई इनामदार, विशाल गायकवाड, सागर खराबी, प्रदीप ढोकले, विशाल धुमाळ, वैभव चव्हाण, गौरव पाचंगे, शरद खोरे आदी उपस्थित होते. स्पर्धेत तृतीय क्रमांकाला ३३ हजार ३३३ रुपये, चतुर्थ क्रमांकाला २२ हजार २२२ रुपये व अंतिम पाचव्या क्रमांकाला ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे समालोचक नरेश ढोमे, रविंद्र जाधव, दत्ता पवार, राहुल पवार, विनोद शिंदे तर पंच म्हणून जितु लोंढे, सचिन पवार, पांडुरंग सरोदे यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील प्रथम चार क्रमांक खालीलप्रमाणे :
प्रथम : शिवशंभो वॉरियर्स जातेगाव.
द्वितीय : रांजणगाव सांडस.
तृतीय : ए. के. लाईव्ह न्हावरे.
चतृर्थ : साईराम ११ शिरुर
पाचवा : कारेगाव.