राजगुरूनगर सहकारी बँकेच्या सल्लागार पदी अॅड. अरुंधती पंडित भोसले / ठाकूर यांची निवड
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या सल्लागार पदी अॅड. अरुंधती पंडित भोसले / ठाकूर यांची निवड…
सत्यविचार न्युज :
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड. अरुंधती पंडित भोसले / ठाकूर यांची आधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. नुकतीच बँकेच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या अधिकृतपणे निवड करण्यात आली.
बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी..
अॅड. अरुंधती पंडित भोसले / ठाकूर हे गेली पंधरा वर्षे पुणे जिल्हा व सञ न्यायालयात वकीली व्यवसाय करत आहेत. प्रामुख्याने फौजदारी, दिवाणी तसेच कौटुंबिक क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध न्यायालयात काम करत आलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत अनेक पिडीत महिलांना सुध्दा कायदे विषयक मदत त्यांनी केलेली आहे.
खरेदी – विक्री व बँक संदर्भातील सर्व प्रकारचे दस्तऐवज दुय्यम निंबधक यांच्या समोर नोंदवून घेणे. या सर्व सामाजिक व वकीली व्यवसायातील कामाची दखल घेऊन बँकेतील सर्व संचालक कमिटीने अॅड. अरुंधती पंडित भोसले / ठाकूर यांना राजगुरूनगर सहकारी बँक मर्यादित वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पॅनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे. विधिज्ञ अरुंधती पंडित भोसले / ठाकूर
यांचे सामाजिक कार्यकर्ते सुहास भोसले व खेड तालुका पत्रकार संघाचे सचिव पत्रकार शरद भोसले यांनी शब्दसुमनांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/03/IMG_20240312_123132-1.jpg)