IPL 2024 : देवाची पूजा अन् नारळ फोडून… पांड्याचे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जंगी स्वागत, पहा Video
सर्व फ्रँचायझींचे खेळाडू आयपीएल 2024 साठी आपापल्या संघात सामील होत आहेत.
IPL 2024 Hardik Pandya In Mumbai Indians : सर्व फ्रँचायझींचे खेळाडू आयपीएल 2024 साठी आपापल्या संघात सामील होत आहेत. या लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या या वेळी मुंबई इंडियन्सची जबाबदारी सांभाळणार आहे. यासाठी तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये मार्क बाउचरसोबत दिसत आहे. मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये हार्दिक पांड्याचे जंगी स्वागत करण्यात आले. हार्दिक पांड्याने सर्वप्रथम देवाचे आशीर्वाद घेतले. आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी नारळ फोडण्याचे काम केले.
हार्दिक पांड्याने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आयपीएल 2015 चा भाग बनला. पण आयपीएल मेगा लिलाव 2022 पूर्वी तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला. तो आता 2 वर्षानंतर संघात परतला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले आहे.
पांड्याची कर्णधार म्हणून कारकीर्द
गुजरात टायटन्स संघ प्रथमच आयपीएल 2022 मध्ये खेळला. या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले. यानंतर गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली, पण विजेतेपदापासून वंचित राहिले.