Pune : पत्रकार पंकज खेळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
सत्यविचार न्यूज :
पुण्यातील पत्रकार पंकज खेळकर यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराने (Pune) निधन झाले. आज तक आणि ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीमध्ये ते पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. ते 52 वर्षांचे होते. पाषाण येथील सिंध सोसायटीत त्यांचे वास्तव्य होते. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पंकज खेळकर हे मूळचे अकोला येथील होते. गेली 20-22 वर्ष ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गेली 18 वर्ष ते आज तकमध्ये पुणे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. इंडिया टूडे ग्रुपमध्ये असोसिएट एडिटर ही जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे ब्युरो म्हणून देखील जबाबदारी सांभाळत होते.