अध्यात्मिकनगरी तथा उद्योग पंढरी समजल्या जाणाऱ्या महाळुंगे गावाच्या उपसरपंचपदी विश्वनाथ महाळुंगकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली
अध्यात्मिकनगरी तथा उद्योग पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र महाळुंगे ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विश्वनाथ महाळुंगकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सवसह मोठा जल्लोष साजरा केला.
गेली तीन वर्षे श्री क्षेत्र महाळुंगे गावामध्ये राजकिय वादळ पाहायला मिळाले, सरपंच असो किंवा उपसरपंच पदासाठी अटीतटीच्या निवडणुका ग्रामस्थांनी पाहायला मिळाल्या परंतु या वेळेस म्हाळुंगकर यांनी विरोधकांच्या भावनांचा आदर करत ही निवडणूक बिनविरोध करून स्वतःच्या पथ्यावर पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले
काही दिवसांपूर्वी रिक्त झालेल्या या पदासाठी श्री क्षेत्र महाळुंगे गावच्या ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. उपसरपंच पदासाठी पल्लवी भालेराव व विश्वनाथ महाळुंगकर यांनी अर्ज भरले होते परंतु म्हाळुंगकर यांनी विरोधकांशी चर्चा करून सर्वांना बरोबर घेऊन गावात विकासकामे करणार असे आश्वासन दिले तद नंतर पल्लवी भालेराव यांनी आपला अर्ज मागे घेतला मग म्हाळुंगकर यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने विश्वनाथ महाळुंगकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाळुंगे गावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रज यांनी घोषित केले. ग्रामपंचायत महाळुंगे गावच्या सरपंच मंगल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीच्या वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
विश्वनाथ महाळुंगकर याची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांनी रीती- रिवाजा प्रमाणे श्रीपती बाबा महाराजांच्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या सभा मंडपात भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालया समोर खेड तालुका रा. यु. काँ खजिनदार लीलाधर तुपे, पुनीत पवार, शैलेश गायकवाड, सम्राट तुपे, कैवल्य जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वनाथ महाळुंगकर म्हणाले,” श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर व विश्वासात घेवून गावचा सर्वांगीण विकास करणार आहे.”