चंद्रकांत गोरे यांची शिरूर विधानसभा निरीक्षकपदी निवड,.
सत्यविचार न्युज : चाकण येथील पुणे जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे यांची शिरूर विधानसभा निरीक्षकपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यातील २५२ विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षकांच्या अधिकृत नियुक्त्या केल्या आहेत. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप व भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण येथील उद्योजक चंद्रकांत गोरे यांना शिरूर विधान सभेच्या निरीक्षकपदी काम करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली.