स्वावलंबी नवउद्योजक बनविणेसाठी लघुउद्योजक प्रशिक्षण
सत्यविचार न्युज :
शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी, पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या अमृत महामंडळ (Acadamy of Maharashtra Research Upliftment and Training) यांचे पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूर, मावळ येथील लाभार्थ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये डोंबिवली येथील ध्रुव आय.ए. एस अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे ह्यांनी व्यवसाय कसा निवडावा, प्रकल्प अहवाल, कर्ज उभारणी कशी करावी, कोणत्या गोष्टींचा बारकाईने विचार करावा, तसेच दुग्ध व्यवसाय, अगरबत्ती निर्मिती, पौरोहित्य, खाद्य पदार्थ निर्मिती, robotics, अमृत पेठ, शेती आधारीत अन्न प्रक्रिया उद्योग अशा विविध उद्योगांचे बाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाला युनिक स्किल डेव्हलमेंटचे श्रीराम देशपांडे, सीकेपी पब्लिक ट्रस्टचे निलेश गुप्ते व सुळे, तसेच डेअरी व्यवस्थापन तज्ञ शिल्पा कशाळकर, वंजारी , ध्रुवचे पुणे विभाग प्रमुख महेश कोरडे उपस्थित होते.
पुणे शहर, पुरंदर तालुका प्रतिनिधी मोरेश्वर कुलकर्णी, रोहिणी मसाल व कमलाकर कुलकर्णी ह्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थितरित्या संयोजन केले.