शिरूर लोकसभा मतदारसंघात मनसेच्या विचारांचा झंझावात…
राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांची धरसोड वृत्ती सुरू आहे. या राजकीय घडामोडींमुळे विकास कामासाठी कोणत्या नेत्यांचा आदर्श घेत पक्षाची वाट धरावी असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. असे असताना खेड तालुक्यातील तरुणांनी मनसे पक्षाला पसंती देत समीर थिगळे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून जुन्नर तालुक्यानंतर आबेगांव तालुका व आंबेगांव तालुक्यानंतर आता खेड तालुक्यात जिल्हा अध्यक्ष समीरभाऊ थीगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकण शहर अध्यक्ष महेश शिरोळे यांच्या नेतृत्वात आज चाकण मधील युवा उद्योजक माधव आप्पा गिते व युवानेते कृष्णा शिंदे यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह पक्षप्रवेश राजगुरुनगर येथे संपन्न झाला..
यावेळी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत,राजगुरुनगर शहर अध्यक्ष मा सोपान डुंबरे,चाकण रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष शुभम कोंडेकर,खेड तालुका प्रसिध्दी प्रमुख भरत बच्चे,चांडोली शाखा अध्यक्ष प्रफुल्ल ताये व असंख्य मनसेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पक्ष प्रवेश केलेल्या या तरुण वर्गाला कोणताही राजकीय वारसा नाही. तसेच राज्यातील राजकारणाला कंटाळून आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचार पटत असल्याने पक्ष प्रवेश करत आहोत असे तरुणांनी सांगितले.