ज्ञानगंगा स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इमारतीचे आळंदीत उदघाटन
आळंदी ( प्रतिनिधी ) : येथील ज्ञानगंगा स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण अनावरण खेडचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते ह. भ. प. शांतीब्रह्मा मारुती महाराज कुरेकर, ह. भ. प. डॉ. नारायण जाधव महाराज, ह. भ. प. मनोहर महाराज औटी यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील, रामचंद्र भोसले पाटील, माजी सभापती शिक्षण मंडळ श्रीधर कुऱ्हाडे पाटील, गट शिक्षणाधिकारी खेड अमोल जंगले, इंग्लिश मेडीयम स्कूल संस्थापक संघ अध्यक्ष सुदर्शना त्रिगुनाईत, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, डॉ. रामशेठ गावडे, माजी नगरसेवक सागर भोसले आदींसह शिक्षक, शालेय मुलांचे पालक उपस्थित होते. या प्रसंगी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विजय गुळवे, अविनाश गुळवे, प्रतीक गुळवे, पांडुरंग गुळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व महिला शिक्षकांच्या वतीने शाळेच्या प्रगती तील योगदाना बद्दल संस्था सचिव वैष्णवी गुळवे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष विजय गुळवे यांनी केले. त्यांनी यावेळी शाळा सुरू करताना भाड्याच्या जागेत शाळा सुरू केली. शाळेचे ठिकाण ४ वेळा यामुळे बदलावे लागले. तसेच शाळा सुरू केल्या नंतरही आलेल्या समस्या व कोणतेही राजकीय आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा कशी शुन्यातून प्रगती केली याचे विवेचन केले.
ह. भ. प. शांतीब्रह्मा मारुती महाराज कुरेकर, ह. भ. प. नारायण जाधव महाराज, ह. भ. प. मनोहर महाराज औटी यांनी या प्रसंगी मनोगते व्यक्त करीत शाळेचे वाटचालीस शुभाशीर्वाद दिले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, इंग्रजी माध्यम विद्यालय चालवताना येणाऱ्या अडचणींना संस्थांना कशा प्रकारे सामोरे जावे लागते, मार्ग काढावा लागतो स्वयं अर्थंसहायित असून ही प्रशासकीय नियमांना कसे सामोरे जावे लागते याचे थोडक्यात विवेचन केले. तसेच गुळवे परिवाराला ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभला आहे. जागा विकत घेऊन ज्ञानदानाचे काम त्यांनी चालू केले आहे. इतके पवित्र कार्य माउलींनी त्यांच्या वाट्याला दिले ही खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे. त्याशिवाय हे सुख वाट्याला येत नाही. आज हे थोर पुण्यफळाला आले आहे, यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितले. प्राचार्य विजय गुळवे सर यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच संस्था व शाळेच्या पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. य प्रसंगी शाळेचे विद्यार्थी, पालक व आळंदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी स्नेहभोजन उत्साहात झाले. शाळेचे संचालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्काऊट गाईड चे विद्यार्थी, आळंदी शहर पोलिस प्रशासन यांनी परिश्रम पूर्वक कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले.