राजगुरुनगर येथे खाती उघडण्यास गर्दी
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खाती उघडण्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेत महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खाती १०० रुपयांत उघडणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केली होती.
त्यानंतर बँकेत खाती उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. सुमारे २ हजार नवीन बचत खाती उघडण्यात आली
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खाती उघडण्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेत महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खाती १०० रुपयांत उघडणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केली होती.
त्यानंतर बँकेत खाती उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. सुमारे २ हजार नवीन बचत खाती उघडण्यात आली असे ओसवाल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरू शकणाऱ्या अनेक महिलांची कुठल्याच बँकेत खाती नाहीत. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी सर्वच बँकांनी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे महिलांमध्ये बँकिंग साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे, असे ओसवाल म्हणाले.
राजगुरुनगर (ता. खेड): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राजगुरुनगर सहकारी बँकेत खाती उघडण्यासाठी महिलांची झालेली गर्दी.