विनायकभाऊ यशवंतराव भोसले यांचे निधन,
महाळुंगे येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ यशवंतराव भोसले (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, सूना, नातवंडे, जावई, पुतणे असा परिवार आहे.
श्रीक्षेत्र महाळुंगे गावचे माजी उपसरपंच विशाल भाऊ भोसले यांचे चुलते तर कामगार नेते किशोरभाऊ भोसले व युवा उद्योजक सचिनदादा भोसले यांचे ते वडील होत.