साने गुरुजी विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
सत्यविचार न्यूज
साने गुरुजी विद्यालयात आज २७ जुलै २०२४ रोजी शिक्षण सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बापूसाहेब चौधरी पाटील होते. वृक्षारोपणाच्या महत्त्वाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक बापूसाहेब चौधरी पाटील यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी खेड तालुका खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष श्री अनिल शेठ शिंदे, पालक प्रतिनिधी श्री. शहाजी चौधरी, महिला पालक प्रतिनिधी सौ .रुपाली ताई गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र चौधरी पाटील, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री विष्णू काळे सर, श्री कंठाळे सर, सौ. धनश्री पाटील मॅडम, सौ. संध्या म्हसे मॅडम, सौ. वैशाली ताई चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी श्री.गोरख चौधरी, भरत निंबाळकर, पांडुरंग डेरे , राजेंद्र भोगाडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रवींद्र चौधरी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि या वृक्षारोपण उपक्रमामुळे विद्यालयाचा परिसर हिरवागार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.