निघोजे गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन !
सत्यविचार न्युज :
निघोजे ग्रामपंचायत यांच्या सुमारे अडीच कोटींच्या निधीतून विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये निघोजे येथील ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
स्मशानभूमी जवळ ओढ्यावर संरक्षणासाठी बंदिस्त करणे त्यासाठी ओढ्यावर स्लॅब,
ग्रामपंचायत कार्यलयाशेजारी सर्व सुविधायुक्त वाचनालय / ग्रंथालय करणे,
स्मशान भूमी ते महाळुंगे रस्त्यावरील देहू कोरण वस्ती येथे नवीन स्ट्रीट लाईट बसविणे,
शिव पार्वती मंदिर टेकडी परिसरात सुशोभीकरण करणे,
डोंगर वस्ती येथील अंतर्गत बंदिस्त गटार करणे आदी कामाचा शुभारंभ सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच अजित येळवंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.