राजगुरुनगर : (अमितकुमार टाकळकर)
येथील खेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. ९) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ७८५७ प्रकरणांपैकी ४८६६ प्रकरणे निकाली निघाली आणि १६ कोटी ८७ लाख ३ हजार ३६८ रुपयांची रुपयांची वसुली झाली.
याचे उद्घाटन प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए. ए. घणिवाले, दिवाणी न्यायाधीश पी. एस. इंगळे, सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. होडावडेकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. बी. पवार, सह दिवाणी न्यायाधीश सरिता विश्वाभरण, न्यायाधीश एम. बी. पाटील, एस. बी. नाईकनवरे, जे. व्ही. मस्के, राजगुरुनगर बार असोशिअशनचे उपाध्यक्षा सोनम नाईकरे, सचिव प्रमोद वाडेकर, खजिनदार मोहिनी केदारी, लोकल ऑडिटर श्रीकांत कौदरे, ऍड. पूजा फडके, अपेक्षा धुमाळ, प्रशांत राक्षे, जेष्ठ विधीज्ञ अॅड. पोपटराव तांबे व बाळकृष्ण सांडभोर, माजी अध्यक्ष अॅड. देविदास शिंदे व अॅड. अरुण मुळूक, विधी सेवा प्राधिकरण समितीचे समन्वयक परमेश्वर बनसोडे यांसह न्यायिक अधिकारी, वित्त व प्रशासकीय कर्मचारी, वकील आणि पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.
या लोकअदालातीसाठी एकूण पाच पॅनल बसविण्यात आली होती. त्यांमध्ये वकील सदस्य म्हणून अॅड. अबुबकर पठाण, अॅड. शारदा राक्षे, अॅड. अनिल वाडेकर, अॅड. पूनम आरुडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अॅड. बिभीषण पडवळ व सूत्रसंचालन सचिव अॅड. पवन कड यांनी केले. अॅड. वैशाली चौधरी यांनी आभार मानले.
चौकट :
या लोकअदालतमध्ये न्यायालयातील एकूण ७८५७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४८६७ प्रकरणे परस्पर सामंजस्याने निकाली निघाली. प्रलंबित १९४४ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यांपैकी २६२ प्रकरणे निकाली निघाली आणि ९ कोटी ५० लाख ४३ हजार ८४४ रुपयांची वसुली झाली. तसेच दाखलपूर्व ५९१३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी ४६०५ प्रकरणे निकाली निघाली आणि ७ कोटी ३६ लाख ५९ हजार ५२४ रुपयांची वसुली झाली. अशाप्रकारे एकूण १६ कोटी ८७ लाख ३ हजार ३६८ रुपयांची वसुली झाली.