श्रींचा आळंदीत रथोत्सव होणार आहे. दरम्यान भाविकांचे स्वागताची मंदिरात तयारी पूर्ण झाल्याचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले.
आळंदीला भक्त निवासाची गरज
आळंदीतील कार्तिकी निमित्त चाकण चौक येथील शाळेच्या मैदानावर तसेच नदी परिसरातील मोकळ्या जागांवर भाविकांनी राहुट्या उभारून निवारा व्यवस्था केली आहे. कार्तिकी यात्रा अनुदान आणि राज्य तीर्थक्षेत्र निधीतून भाविकांसाठी विकास आराखड्यातील राखीव जागेत भक्त निवासाची व्यवस्था करण्याची मागणी आळंदी ग्रामस्थ ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी केली आहे. मंदिर परिसरात धोकादायक इमारती वापरास यात्रा काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतींना देखभाल दुरूस्ती करण्यास परवानगी देण्याची गरज असताना मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
संत साहित्याने दुकाने बहरली
यात्रेत भाविकांना तुळशीचे माळा, वारकरी संत साहित्यादी उपलब्ध झाले आहे. माऊली मंदिरात वारकऱ्यांना मोफत औषध वाटप विविध सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाले आहे. वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी माऊली मंदिरात पोलीस सुरक्षेस तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात प्रसाद वाटप सुरू आहे. महिला व पुरुष सेवक स्वकामचे सेवा मंडळाचे स्वयंसेवक अध्यक्ष सुनील तापकिर यांचे नियंत्रणात सेवा देत आहेत. माऊली भक्तांना खिचडी वाटपास सेवारत झाले आहेत. झाडी बाजारात प्रसाद पेढे व माळेंची दुकाने थाटली असल्याने लक्षवेधी दिसत आहेत.
वारक-यासाठी आळंदीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर
उच्चं तंत्र शिक्षण मंत्री ताठ सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आळंदी कार्तिकी यात्रेस आलेल्या भाविक वारकरी यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वारक-यासाठी आळंदीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे वारकरी सेवा संघाच्या सचिव पंढरपूर मंदिर समितीचे विश्वस्त अँड. माधवीताई निगडे यांनी सांगितले. या शिबिराचे उदघाटनास समर्थ युवा फाऊंडेशनचे राहुल पाखरे, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार, सचिव माधवी निगडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त श्रीयोगी निरंजननाथ, वारकरी महामंडळ अध्यक्ष विलास बालवडकर, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन शिंदे, आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, वारकरी सेवा संघ भोर तालुका अध्यक्ष संजय बोरगे, सौरभ शिंदे उपस्थित होते.
या शिबिरात मेडिकल चेकअप वाहनातून मोफत आरोग्य तपासण्या केल्याजात आहेत. यामध्ये रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, छातीचा एक्स रे, रक्त तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी, मॅमोग्राफी अशा तपासण्या केल्याजात असल्याचे वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ रंधवे यांनी सांगितले. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था यांचे यासाठी सहकार्य लाभले असून यासाठी कैवल्य वेल्फेर फाउंडेशन पुणे यांनी संकल्पना दिली आहे. या शिबिरासाठी कार्तिकी यात्रेत जनजागृती केली जात असून वारकरी यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अँड. माधवीताई निगडे यांनी केले आहे.