आळंदी कार्तिकी यात्रेस हरिनाम गजरात सुरुवात
श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजन परंपरेने उत्साहात
आळंदी : श्रींचे कार्तिकी यात्रेस श्रीगुरु हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने विविध धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात प्रारंभ झाला. यावेळी श्रींचे पायरी पूजन प्रसंगी क्षेत्रोपाध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांनी वेदमंत्रजयघोषासह श्री गुरु हैबतबाबा यांचे दिंडीचा हरिनाम गजरात कार्तिकी यात्रा २०२३ अंतर्गत ७२८ व्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास भाविकांचे नामजयघोषात मंगळवारी (दि. ५ ) प्रारंभ झाला. राज्याचे कानाकोपऱ्यातून भाविकांची पाऊले आळंदीचे दिशेने पडत असून श्री संत नामदेवराय महाराज , भक्त पुंडलिक, श्री पांडुरंगराय पादुका पायी वारी पालखी सोहळे हरिनाम गजरात आळंदीत आगमन झाले.
श्रींचे पायरी पूजन प्रसंगी श्रींचे पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर, राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर परिवाराचे वतीने श्री गुरु हैबतबाबा यांचे पायरीची पूजा करण्यात आली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, ह. भ. प. केशव महाराज नामदास, श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, श्रींचे मानकरी योगिराज कुर्हाडे, योगेश आरू, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक उपायुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, अजित वडगावकर, ॲड. विष्णू तापकीर, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर दिघे, भिमाजी घुंडरे, श्री विठ्ठल घुंडरे, रामदास दाभाडे, किरण कोल्हे आदींसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यात वारकरी परंपरा जोपासत टाळ, विना, मृदंगांच्या त्रिनादात हरिनाम गजर करीत श्रीगुरू हैबतबाबा यांच्या वैभवी पायरीचे पूजन करीत श्रींचे ७२८ व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात सुरुवात झाली. कार्तिकी यात्रे माऊली मंदिरातील प्रथिनांचे पालन करीत भल्या पहाटे घंटानादाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पवनाम अभिषेक वेदमंत्र जय घोषात झाला. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर कुटुंबाच्या वतीने ऋषिकेश आरफळकर यांचे हस्ते आकर्षक फुलांनी सजलेल्या श्रीगुरू हैबतबाबा यांचे पायरीची पूजा झाली. श्रीगुरू हैबतबाबा पायरी पूजेत वेद मंत्राचा जयघोष, दही, दूध, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, फुले वाहत प्रसाद महानैवेद्य झाला. श्रींचे आरती झाली. यावेळी पूजेचे पौरोहित्य वेदमुर्ती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. परंपरेने उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला.
श्री गुरू हैबतबाबा यांच्या ओवरीत दिंडीची मंदिर प्रदक्षिणा नंतर पूजा, आरती झाली. ओवरीत विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत पूजा विधी झाला. पालखी सोहळाचे मालक आरफळकर यांच्या हस्ते विश्वस्त व मानकऱ्यांचा नारळ प्रसाद देण्यात आला. आळंदी बंदचे पार्श्वभूमीवर आळंदीत तसेच मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
पुणे येथील सोने मारुती चौकातील विजय ज्वेलर्स यांनी कार्तिकी निमित्त आळंदी मंदिरातील श्रींचे विविध धार्मिक प्रसंगीचे चांदीच्या वस्तू, साहित्य, गाभाऱ्यातील कमान यांना पॉलिश करीत नवी झळाळी दिली. यासाठी
आशिष वेणेंकर , संतोष पवार , महेश मैड , दिनेश शेलार , गजनना दहिवाळ , दिनेश आरेणकर ,कृष्णा मैड ,सिनिवास मैड यांनी परिश्रम पूर्वक सेवा रुजू केली. यावेळी श्रींचे पुजारी अमोल गांधी, महेश जोशी, सेवक बल्लाळेश्वर वाघमारे यांच्या उपस्थितीत व नियंत्रणात पालखीसह विविध भांडी साहित्य संपूर्ण पॉलिश करून घेण्यात आले. मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणी नदी परिसरात तसेच विविध ठिकाणी कीर्तन प्रवचन आधी कार्यक्रम सुरु झाले आहे. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नागरी सेवा सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे.