ज्ञानेश्वर खराबी यांचे निधन
चाकण : प्रतिनिधी
येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर अहिलू खराबी ( वय – ९७ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तीन मुले, एक बहिण, सुना, नातवंडे, पतवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी उपसरपंच प्रकाश खराबी यांचे ते वडील, तर खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराजे खराबी यांचे ते चुलते होत. त्यांचा अनेक सेवाभावी संस्था व संघटनांशी जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चाकण येथील चक्रेश्वर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी खराबी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.