स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गोशाळेस चारा दान, म्हाळुंगकर कुटुंबाचा अनोखा उपक्रम
सत्यविचार न्यूज :
वाढदिवस साजरा करण्याची दिवसेंदिवस स्पर्धा लागली असुन वाढदिवसावर खूप अनाठायी खर्च केला जात आहे.
मात्र याला अपवाद युवा उद्योजक संजय भाऊ म्हाळुंगकर पाटील यांचे चिरंजीव वरद संजय म्हाळुंगकर याचा वाढदिवस दरवर्षी केक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अनाठायी खर्च न करता सामाजिक कार्यांसाठी किंवा गरजूंसाठी मदत करीत वाढदिवस साजरा करतात.
यावर्षी पाबळ येथील गो शाळेतील जनावरांना चारा म्हणून कडबा व गवत अश्या प्रकारचा चारा देत वाढदिवस साजरा करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला.
या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे, तसेच एक वेगळा आदर्श इतरांनी घेण्यासारखा असल्याचे समाजात बोलले जात आहे.
वाढदिवसानिमित्त पाबळ गोशाळेस चारादान म्हाळुंगकर परिवाराचा अभिनव उपक्रम
आपल्या पाल्याचा अर्थात वरद संजय म्हाळुंगकर यांच्या १५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय विनायक म्हाळुंगकर यांनी सुमारे ४ टन चारा पाबळ येथील गोशाळेस दान करून आपल्या मुलाचा वाढदिवस अनोखा साजरा केला.
यावेळी वरद म्हाळुंगकर, विनायक म्हाळुंगकर, संजय म्हाळुंगकर, निवृत्ती आरुडे, उद्योजक चंद्रकांत सोनवणे, रॉबिन कुमार सिंग, श्रेयस सोनवणे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक बाळासो चौधरी, आदर्श शिक्षक दीपक जगताप, मच्छिंद्र गव्हाणे उपस्थित होते.