येलवाडी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलवाडी शाळेतील मैदानावरील स्टेज वरती आकर्षक नियोजित आराखड्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम व इतर सर्व शालेय कार्यक्रमांसाठी सुसज्ज टेज वरती छत व शाळेतील सर्व वर्ग खोल्याना आतून व बाहेरून कलरचे काम ॲप इंडिया कंपनी खालुम्ब्रे यांच्या सीएसआर फंडामधून सुरू केले.
या कामाचे उदघाटन कंपनीच्या व्यवस्थापनाच्या हस्ते करण्यात आले, यावेळी श्रीक्षेत्र येलवाडी गावचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक रणजीत गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर भाऊ गाडे व माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुजाता गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे , सदस्य संदीप गाडे, सोमनाथ देशमुख ,माजी उपसरपंच तानाजी गाडे आदी ग्रामस्थांसह शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडे सर यांनी केले व प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी केल.