विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठीपुर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल- दुर्गावाहिनी- मातृशक्ति राजगुरुनगर शहर प्रखंडाच्या वतीने आनंदी आनंद मंगल कार्यालय येथे भव्य हिंदू सम्मेलन पार पडले.
या भव्य कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत संच सदस्य विधी प्रकोष्ट ॲड संकेतजी राव वारकरी संप्रदायाचे भूषण संत तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज ह.भ.प. मा. शिरीष महाराज मोरे बारामती चिंचवड भीमाशंकर विभाग मंत्री नितीनजी वाटकर भीमाशंकर जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी काळे जिल्हा मंत्री संतोषजी खामकर बजरंग दल जिल्हा संयोजक गणेशजी रौंधळ राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे खेड तालुका सह कार्यवाह महेश कड, मातृशक्ति जिल्हा संयोजिका वैशाली ताई लांडगे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत संच सदस्य विधी प्रकोष्ट मा.ॲड संकेतजी राव यांचे सामजिक समरसता या विषयावर प्रबोधन करण्यात आले वारकरी संप्रदायाचे भूषण ह.भ.प. मा.श्री. शिरीष महाराज मोरे यांनी हिंदूत्व हि काळाची गरज व या पुढील हिंदुत्वा पुढील आव्हाने या विषयावर प्रबोधन करण्यात आले बारामती चिंचवड भीमाशंकर विभाग मंत्री मा.श्री.नितीनजी वाटकर यांनी विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती वर्षा निम्मित विश्व हिंदू परिषद स्थापना व उद्देश व संघटनेच्या विविध आयामा बद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.. या सर्व वक्त्यांनी हिंदू समाज व देशा समोरील आव्हाने व त्यासाठी येणाऱ्या कालखंडात विश्व हिंदू परिषदे सोबत जोडले जाऊन बलशाली वैभवशाली हिंदुराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असे प्रखर विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद राजगुरुनगर शहर प्रखंड अध्यक्ष विरेंद्र भागवत, राजगुरुनगर शहर प्रखंड मंत्री मयूर सावंत सहमंत्री सुरेश माळी व नवनाथ पाचारने, बजरंग दल संयोजक निखील थिगळे, मातृशक्ति संयोजिका सुरेखा ताई डूबे, दुर्गा वाहिनी संयोजिका कु सृष्टी गायकवाड, साप्ताहिकं मिलन प्रमुख संकेत शितोळे, बलोपासना प्रमुख सिद्धेश लोहोट, धर्मप्रसार प्रमुख सुनिल सांडभोर, सत्संग प्रमुख गोविंद जिनोदिया, आदेश शिंदे, नितीन कोळेकर, प्रतिक जगदाळे, राहुल पुरोहित निखील गावडे सक्षम हेडा या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमास उपस्थिती राहिली.
तसेच विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह अधीक्षक अमोल डमरे, भारतीय जनता पार्टीचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शरद भाऊ बुट्टॆ पाटील, भारतीय जनता पार्टीचे पुणे ग्रामीण अध्यक्ष माथाडी कामगार मिलिंद भाऊ जगदाळे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधिर भाऊ मुंगसे, शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय भाऊ जाधव, भारतीय जनता पक्षाचे खेड तालुका सरचिटणीस अक्षय प-हाड व अतुल भाऊ कुलकर्णी, छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश दादा गुंडाळ, वाघेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष युवा उद्योजक सुरज भाऊ राक्षे व बंटी तांबे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
तसेच राजगुरुनगर शहर प्रखंडा मधील सर्व गणेश उत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे तसेच सामाजिक, राजकीय शैक्षणिक, धार्मिक संस्था, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विश्व हिंदू परिषदेच्या आचार पद्धतीनुसार त्रिवार ओंकार एकात्मता मंत्र विजय महामंत्र दीपप्रज्वलन व व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचा परिचय व समारोप पसायदान घेऊन करण्यात आला.
यावेळी ३०० बजरंगी, दुर्गा १५ मातृ ३५ व सुमारे ५० बाल बजरंगी या कार्यक्रमात सहभागी झाले.एकूण संख्या बजरंगी मातृशक्ती व दुर्गावाहिनी ४०० संख्या प्रत्यक्ष उपस्थिती होती