चाकण लायन्स क्लबच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी,
चाकण : प्रतिनिधी
चाकण लायन्स क्लब व श्रद्धा हॉस्पिटल यांच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिराचा १५० महिलांनी लाभ घेतला.
या शिबिरामध्ये डॉ. विद्या भोसले, डॉ. साक्षी भोसले, डॉ. लता त्रिंबके व डॉ. सीमा गवळी यांनी महिलांची रक्ततपासणी, हिमोग्राम, सिरम कॅल्शिअम तपासणी, बीएमडी, हाडांची आरोग्य तपासणी केली. तसेच मेनोपॉज लक्षणे व उपचार प्रणाली आणि आहारविषयक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुनीता सोरटे, वंदना मिरगे, उज्वला जाधव, मनीषा पवार, अपर्णा कानडे, सुरेखा शिंदे, चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश कानडे, सचिव आशुतोष कानडे, अविनाश सोनवणे, हृतिक मुटके तसेच झोन चेअरमन शितल गावडे उपस्थित होत्या. अपर्णा कानडे यांनी आभार मानले.