युवकांनी युवकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा – प्रा. शिवाजीराव कोठुळे पाटील
सत्यविचार न्यूज :
युवा ही देशातील सर्वात मोठी ताकद आहे. युवा हा देशाला नवे विजन ,नवी दिशा देऊ शकतो त्यासाठी प्रथमता युवा सुधारला पाहिजे तो आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि युवा सुधारला तर देश सुधरेल असे वक्तव्य राष्ट्रीय युवा शक्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव कोठुळे पाटील यांनी वर्धापन दिनानिमित्त केले.
वार सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी आळंदी येथे आंतरराष्ट्रीय युवा दिना दिवशी राष्ट्रीय युवाशक्ती संघाचा वर्धापन दिन असतो यानिमित्ताने सर्व संघाचे पदाधिकारी जमलेले होते. त्यावेळेस कोठुळे म्हणाले आपल्याला महाराष्ट्रा सहित भारतभर संघटनेला बळ द्यायचा आहे आणि प्रत्येक युवकाने निस्वार्थपणे युवकांच्या प्रगतीसाठी काम करायचा आहे. आपल्या सोबतचा युवकांनी प्रगती केली त्यावेळेस आपली पण आपोआप प्रगती होते यासाठी प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. संघाच्या माध्यमातून आपण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हातभार लावणार आहोत पण देशातील अर्थव्यवस्था मजबूत होत असताना गोरगरिबाला आणि सामान्य युवाला याचा जर त्रास होत असेल तर याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पण संघटना काम करेल. सामाजिक काम करत असताना युवकांचे योग्य शिक्षण, शिक्षण झालेल्या युवकांना योग्य ठिकाणी कामाला लावून परमनंट करणे, व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करणे, युवकांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी आवाज उठवणे या कामावरती संघातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्यात यावे.
राष्ट्रीय युवा शक्ती संघ हा आचार्य चाणक्य आणि भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव यांची प्रेरणा घेऊन चालत आहे. संघ हा सदैव युवकांच्या प्रगतीसाठी आवाज उठवेल आणि देशांमध्ये एकता, बंधुता आणि समानता शांततेच्या मार्गाने प्रस्थापित राहण्यासाठी काम करेल. यासाठी प्रत्येकाने आपापल्या प्रांतामध्ये लक्ष देऊन काम केले पाहिजे आणि आपला नारा सोबत या प्रगती करू हा नारा प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवला पाहिजे. असे शिवाजीराव कोठुळे म्हणाले. याप्रसंगी पीएसआय शुभम गोडसे, यशोदीप अकॅडमी चे संस्थापक योगेश दरेकर, आनंद वडगावकर, शुभम पाटील ,उदय जायभाये, गणेश कातकडे ,मधुसूदन मुळे ,धनंजय मात्रे, महेश खोटे, अरुण दुबाले, स्वप्निल शिंदे, पवन बीके, कृष्णा बुरंगे,ज्ञानेश्वर मात्रे, तेजस शिंदे, कृष्णा आरले, बाबासाहेब दौंड ,ऋषिकेश लिपणे, अजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.