जागतिक वारसा नामांकन प्रचारासाठी सिंहगडावर दुचाकी रॅली संपन्न
पुणे : जागतिक वारसा नामांकन प्रचार, प्रसारासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सिंहगडावर दुचाकी रॅलीच्या आयोजन करून या मोहिमेची सुरवात केली .
महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान असलेली भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामकणासाठी प्रस्तावित केले आहेत. या नामांकनाचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळाली आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, डॉ.विलास वाहणे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय कार करीत या वाहणे यांच्या माधमातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज, तिरंगा ध्वज फडकवीत स्वच्छतेचा नारा देऊन जनजागृती प्रसार च्या मोहिमेला सुरवात केली.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहे. यासाठी युनेस्कोची प्रतिनिधी मंडळ समिती सदस्य येत्या ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांना भेटी देणार आहे. यादरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रचार प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. सिंहगडावरील पार्किंग येथून १०० मोटरसायकल घेऊन जनजागृती रॅली पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी डॉ विलास वाहने सहायक संचालक पुरातत्व विभाग पुणे विभाग यांनी सर्व गडप्रेमी, सामाजिक संस्था, नागरिक यांना जागतिक वारसा 12 गडकिल्यांचे नामांकन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे कार्य केले पाहिजे तसेच या सांस्कृतिक वारसा चे महत्व देऊन, स्वच्छता राखणे याबबद्दल सर्वांना आव्हान केले . याच बरोबर उपस्तिथ गडप्रेमी, नागरिक, पुरातत्व विभागाचे सहकारी, सामाजिक संस्था यांनी गड किल्ल्याची स्वच्छता राखणे व जागतीक वारसा नामांकनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शपथ घेण्यात आली.
या उपक्रमात, भारत पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी पुणे, वनविभाग पुणे, आम्ही पुणेकर, स्वान, वी फाँउडेशन यामध्ये या संस्थांचा सहभाग होता. मोहीमेचे आयोजन आम्ही पुणेकर च्या सहकार्याने करण्यात आहे.